मुख्य पान

संत ज्ञानदेव व नामदेव पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे . या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी च्या रूपाने एक अधिष्ठान दिले . संप्रदायाला निश्चित स्वरूप दिले . संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वतःची कीर्तनपद्धती निर्माण केली . संप्रदायाचा प्रसार पंजाब पर्यंत केलाच याशिवाय विविध संतांची चरित्रे व स्वतःचे चरित्र – आत्मचरित्र लिहून एकप्रकारे दस्तऐवजीकरण – डॉक्युमेंटेशन केले .
ज्ञानदेव – नामदेव काळात – संत गोरोबा काका , सावता महाराज , चोखोबाराय , नरहरी महाराज , जनाबाई , मुक्ताबाई , निवृत्तीनाथ , सोपानकाका , सोयराबाई , विसोबा खेचर , परिसा भागवत इ . संत मंडळी या संत मांदियाळीत होती .
पुढे संत एकनाथ महाराजांनी संप्रदायाला भागवत ग्रंथ रुपी खांब दिला .
संत तुकोबा या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले . तुकोबांच्या काळात संताजी जगनाडे , रामेश्वर भट्ट वगैरे तुकोबांचे सहकारी होते . तुकोबांच्या पश्चात झालेले संत निळोबाराय हे वारकरी परंपरेतील शेवटचे संत होत .
तुकोबांच्या शिष्या असलेल्या व ज्यांना तुकोबांचा प्रत्यक्ष सहभाग लाभला त्या संत बहिणाबाई या इमारतीवरील पताका म्हणजेच ध्वज झाल्या .

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।


पंढरी वर्डप्रेस – https://pandharee.wordpress.com/
पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी. महाराष्ट्राचे लोकदैवत विठोबारायाचे नगर. संतांचे माहेर. भूलोकीचे वैकुंठ. नव्हे नव्हे वैकुंठाहून अधिक माहात्म्य असलेली नगरी.
पांडुरंगासोबतच पुंडलिकराय,संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबा, संत नरहरी सोनार, संत कान्होपात्रा , संत सेना न्हावी यांचे समाधीस्थान.
वारकऱ्यांचे व इतर भाविक भक्तांचे आवडीचे तीर्थक्षेत्र असलेल्या या पंढरी नगरीची माहिती जाणून घेऊयात या साईट च्या माध्यमातून.

श्री क्षेत्र देहू दर्शन – श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या संबंधित विविध मंदिरं व परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती देणारी वेबसाईट

सोपानदेव वर्डप्रेस   https://sopandev.wordpress.com
संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू . संत सोपानकाकांची समाधी श्री क्षेत्र सासवड येथे आहे. सोपानकाकांविषयी माहिती देणारी वेबसाईट

7 thoughts on “मुख्य पान

  1. केदार धोपेश्वरकर says:

    नमस्कार, आपली गेल्या काही दिवसातली संत मुक्ताबाई आणि संत चोखामेळा ही पोस्ट पहिली. मोबाईलवरून हा ब्लॉग जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. अँड्रॉइड फोनवर Quick Info ऍप मध्ये + दाबून warkari एन्टर केलेत तर आपला ब्लॉग ऍपसारखा मोबाईलवर सहज वाचता येतो. तसेच नवीन पोस्ट टाकल्यावर लोकांना नोटिफिकेशनही मिळते. कृपया करून पहावे ही नम्र विनंती. धन्यवाद! Quick Info ऍप : https://play.google.com/store/apps/details?id=com.kd.quickinfo

    Liked by 1 person

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.